रु.3000 सह गोल्ड लोनला सुरुवात, किमान कागदपत्रांची आवश्यकता.
तुम्हाला आज किती गोल्ड लोन मिळू शकते ते शोधून काढा.
किती सोन्याची आवश्यकता आहे हे पाहण्यासाठी रक्कम व कॅरेट मूल्य दाखल करा.
Enter your gold weight (in grams) and carat value to see your eligible amount.
Gold Weight: 0 grams
Loan Amount: ₹0
Carat: 22
आमचा आतापर्यंतचा प्रवास
भारतातील एक सर्वोत्तम NBFC म्हणून 76 वर्षांहून अधिक काळाची परंपरा
आमच्या गोल्ड लोनची वैशिष्ट्ये

जलद वितरण*

दिवसानुसार व्याज दर*

प्रति ग्रॅम सोन्यासाठी कमाल कर्ज*

अल्प व्याज दर*

सुलभ परतफेड पर्याय*

कोणतेही छुपे प्रभार नाहीत*
मणप्पुरम गोल्ड लोनचे फायदे
भारतातील एक सर्वोत्तम NBFC म्हणून 76 वर्षांहून अधिक काळाची परंपरा
तुमचे सोने 100% सुरक्षित व विमाबद्ध आहे
365 दिवसांच्या आत कधीही परतफेड करा*
24x7 अतिरिक्त टॉप-अप सुविधा*
24x7 देखरेख व निरीक्षण*
पूर्णतः विमाबद्ध व्हॉल्ट्स
1949 पासून स्वप्ने सत्यात उतरवत आहोत
आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या वास्तविक कथा
4 सोप्या टप्प्यांमध्ये गोल्ड लोन प्राप्त करा
(भारतातील एक सर्वोत्तम NBFC म्हणून 76 वर्षांहून अधिक काळाची परंपरा)
गोल्ड लोनसाठी आवेदन करा
तुमच्या सोन्याच्या दागिन्यांसह तुमच्या नजीकच्या मणप्पुरम गोल्ड लोन शाखेला भेट द्या.
ग्राहकाचे ऑनबोर्डिंग
ऑनबोर्डिंग प्रकिया जलदपणे व कोणत्याही त्रासाशिवाय पूर्ण करण्यासाठी ओळखीचा व वास्तव्याचा वैध पुरावा प्रदान करा.
तुमच्या सोन्यासाठी उत्तम मूल्य मिळवा
तुम्हाला सर्वोत्तम कर्ज रक्कम मिळण्याची खातरजमा करण्यासाठी आमचे तज्ज्ञ सोन्याचे मूल्यांकन करतील.
वितरण व मंजुरी
एकदा मंजुरी मिळाल्यावर, तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये कर्जाची रक्कम त्वरित जमा करण्यात येईल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
तुम्हाला गोल्ड लोनविषयी माहीत असाव्यात अशा सर्व बाबी
भारतामध्ये गोल्ड लोन मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?
भारतामध्ये गोल्ड लोन मिळवण्यासाठी, तुमच्याकडे आधार कार्ड, पासपोर्ट (पारपत्र), वाहन चालक परवाना, किंवा मतदाता ओळखपत्र यांसारखे ओळखीचे पुरावे, आणि सुविधा देयके, शिधा पत्रिका, किंवा भाड्याचा करार यांसारखा वास्तव्याचा पुरावा असणे गरजेचे आहे. 5 लाखांपेक्षा अधिक रकमेच्या कर्जासाठी, PAN कार्डाची प्रतदेखील आवश्यक आहे. इतर दस्तऐवजांमध्ये पूर्ण भरलेला आवेदन फॉर्म आणि तुमचे बँकेचे विवरण समाविष्ट आहे.
माझे सोने सुरक्षित राहील का?
होय, जेव्हा तुम्ही मणप्पुरम फायनान्स लि.सारख्या विश्वासार्ह कर्जदात्याकडे तुमचे सोने तारण ठेवता, तेव्हा ते कमाल सुरक्षिततेसह जतन केले जाते. अलार्म सिस्टम्स असणारे सुरक्षित स्टोरेज व्हॉल्ट्स, मोशन सेन्सर्स, आणि निर्बंधित प्रवेश यापासून ते विमा संरक्षण आणि 24/7 देखरेखीपर्यंत, जेव्हा तुम्ही आमची निवड करता तेव्हा तुमचे सोने तुम्ही सुरक्षित हातामध्ये सोपवलेले असते. तुमचे सोने योग्य प्रकारे हाताळण्यात येते व जतन करण्यात येते याची खातरजमा करण्यासाठी, मणप्पुरम फायनान्स लि. ही RBIने NBFCजला घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालनदेखील करते.
गोल्ड लोन घेण्यासाठी माझे बँक खाते असे गरजेचे आहे का?
बहुतांश कर्जदात्यांसाठी, बँकेचे खाते बंधनकारक आहे. तथापि, मणप्पुरम फायनान्स लि.सारख्या कर्जदात्यांसाठी, रु.19,500/- इतक्या कर्ज रकमेपर्यंत, जरी तुमचे सक्रिय बँक खाते नसले तरीही तुम्ही गोल्ड लोन मिळवू शकता, परंतु पुढील कारणास्तव तुम्ही बँक खाते उघडावे अशी मोठ्या प्रमाणात शिफारस करण्यात येते -
-
- सुरक्षित व जलद वितरण कारण कर्जाची रक्कम थेट जमा करण्यात येते
- कर्जाच्या रकमेवर कोणतीही मर्याद नाही.
- बँक खाते असणाऱ्या व्यक्तींनाच ऑनलाइन आवेदने करण्यास अनुमती आहे.
मणप्पुरममध्ये गोल्ड लोन मिळवण्यासाठी किती कालावधी लागतो?
तुम्ही पात्रता निकषांची पूर्तता करत असल्यास आणि तुमच्याकडे आवश्यक दस्तऐवज तयार असल्यास, मणप्पुरम फायनान्स लिमिटेडकडून गोल्ड लोन घेण्याची प्रकिया जलदपणे पार पाडण्यात येते. तुमची तयारी पूर्ण झाल्यावर, तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे आवेदन करू शकता, तुमच्या सोन्याचे मूल्यांकन करून घेऊ शकता, आणि कर्जाच्या मंजुरीसाठी तुमचे दस्तऐवज सादर करू शकता जेणेकरून तुम्हाला थोड्याच कालावधीमध्ये कर्ज देता येईल.
कोणतीही बँक/NBFC/इतर वित्तीय संस्था यांच्याकडील तुमचे विद्यमान गोल्ड लोन तुम्ही कशा प्रकारे मणप्पुरमकडे वळवू शकता?
- तुमची पात्रता तपासा आणि आवश्यक दस्तऐवज गोळा करा, उदा. ओळखपत्र, वास्तव्याचा पुरावा आणि कर्जाचे जुने विवरण.
- हे झाल्यावर, नजीकच्या शाखेला भेट देऊन हस्तांतरण प्रकियेसाठी आवेदन करा आणि कर्जाची नवीन रक्कम निश्चित करण्यासाठी तुमचे सोने पडताळून घ्या
- कर्जाची नवीन रक्कम स्वीकारल्यानंतर, हस्तांतरण पूर्ण करण्यासाठी जुन्या कर्जाची परतफेड करा. हस्तांतरण पूर्ण करण्यासाठी नवीन कर्ज करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यास विसरू नका
मणप्पुरम गोल्ड लोनची ऑनलाइन परतफेड कशी करावी?
तुम्ही मणप्पुरम फायनान्स लि.चे गोल्ड लोन हे कस्टमर ईसर्व्हिस पोर्टल किंवा मोबाइल अॅप (OGL अॅप) वापरून डेबिट कार्डाद्वारे किंवा नेट बँकिंग, मोबाइल वॉलेट, किंवा UPI या माध्यमातून ऑनलाइन भरू शकता. कृपया याची नोंद घ्या की मणप्पुरमच्या प्लॅटफॉर्मवर क्रेडिट कार्ड पेमेन्ट्स स्वीकारण्यात येत नाहीत.







